रशिया,युक्रेन युद्ध थांबवण्याचा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना संदेश; शांततेसाठी सर्वोतोपरी मदतीसाठी भारत तयार
रशिया,युक्रेन युद्ध थांबवण्याचा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना संदेश; शांततेसाठी सर्वोतोपरी मदतीसाठी भारत तयार
img
Jayshri Rajesh
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा रशिया दौरा संपत आहे. या दौऱ्याच्या अखेरीस द्विपक्षीय चर्चेवेळी मोदी यांनी राशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनसोबत सुरू असलेले युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात रशियातील भारतीय नागरिकांना या युद्धात झळ पोहोचणार नाही याबद्दल दक्षता घेण्याबद्दल चर्चा झाली. या वेळी मोदी म्हणाले, "जर निरागस बालकांचा युद्धात बळी जात असेल तर ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. युद्धभूमीवर कोणतेच प्रश्न सोडवले जाऊ शकत नाहीत." रशियाने युक्रेनमधील मुलांच्या हॉस्पिटलवर क्षेपणास्त्र डागली होती.

भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करत मोदी यांनी युक्रेन युद्ध थांबवण्याबद्दल थेट मत व्यक्त केले. गेल्या दोन वर्षांतील मोदी आणि पुतिन यांच्यातील ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा होती. शिवाय रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच रशिया दौरा होता.

पुतिन यांनी सोमवारी रात्री मोदी यांच्यासाठी मेजवानी आयोजित केली होती, यामध्येही मोदी यांनी युद्ध थांबवण्याचा संदेश पुतिन यांना दिला होता. तसेच हे युद्ध थांबवण्यासाठी भारत शक्य ते सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

मला जगाला सांगायचे आहे की भारत हा शांततेच्या बाजूने आहे. नव्या पिढीच्या भवितव्यासाठी शांतता आवश्यक आहे. बाँब, बंदुका, गोळ्यांचा वर्षाव अशा वातावरणात शांततेच्या चर्चा यशस्वी होत नाहीत, असे मोदी यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group