अजित पवार यांचं मोठं वक्तव्य : म्हणाले मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर.....
अजित पवार यांचं मोठं वक्तव्य : म्हणाले मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर.....
img
Dipali Ghadwaje
धाराशिव - लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा सर्वच मतदारसंघात धडाडत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज धाराशिवाय येथे प्रचार सभेत आले असताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे 

मोदी यांचं तिसऱ्यांदा सरकार आलं, तर मोफत 300 युनिट वीज मिळणार, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. ते यावेळी म्हणाले की, गरिबांना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा शेतकऱ्यांना वीजबिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. 

निवडणूक त्या मुद्द्यावर जिंकली आणि पाहिलं बिल दिलं शून्याचे. मात्र नंतर पुन्हा आधी सारखे बिल देण्यास सुरुवात झाली. म्हणाले परवडत नाही. मात्र मोदी हे कुठलंही काम करतात, ते मागील पुढील विचार करून करतात.

इतर बातम्या
Join Whatsapp Group