मोठी बातमी !  6 फुटीर खासदारांबाबत घेण्यात  आला  ''हा'' मोठा निर्णय
मोठी बातमी ! 6 फुटीर खासदारांबाबत घेण्यात आला ''हा'' मोठा निर्णय
img
Nandini khandare More


सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर राजकीय भूकंप पाहायला मिळत असून आता 6 फुटीर खासदारांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

 ठाकरे गटच्या 6 बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत घोषणा केली. यानंतरही सर्व खासदारांच्या सुरक्षेबाबत सरकार खूप बारीक लक्ष देऊन आहे. दरम्यान, या आधीच खासदारांना कडक सुरक्षा देण्यात आली होती आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

उबाठाच्या 6 बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी सर्व खासदारांना थेट दिल्ली पालिसांकडून सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या इमारतीला २४ तास सुरक्षा देण्यात आली आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय इमारतीत जाण्यास बंदी आहे. याबाबत दिल्लीतील पोलिसांनी ‘हे आमचं काम आहे, सध्यातरी परवानगीशिवाय कोणी प्रवेश करु नये’ असं सांगितलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group