नवी दिल्ली : सलग तिसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा पुतिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. आपल्या तीन प्रतिस्पर्ध्यांना हरवत आणि 87 टक्के मतं मिळवत पुतिन यांनी विजय मिळवल्याचं रशियानं जाहीर केलं आहे.क्वादिमीर पुतीन यांनी मंगळवारी पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. पुतीन यांनी पुढील सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी शपथ घेतली.
दरम्यान शपथ घेतल्यानंतर पाश्चिमात्य देश आणि युद्धावर मोठं भाष्य केलं आहे. 'मला विश्वास आहे की, आपण या कठीण काळातून बाहेर पडू आणि अधिक मजबूत होईल. विकासाचं लक्ष्य गाठण्यासाठी काही योजना तयार केल्या आहेत. त्या पूर्ण करू, त्याबाबत शंका नाही, असं वक्तव्य पुतीन यांनी केलं.