रशियाच्या लष्करात असलेल्या सर्व भारतीयांची सुटका होणार ;  वाचा सविस्तर?
रशियाच्या लष्करात असलेल्या सर्व भारतीयांची सुटका होणार ; वाचा सविस्तर?
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली ;  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया दौऱ्यावर आहेत. मोदी आणि पुतिन यांच्यात भेट झाली आहे.भेटीमध्ये पंतप्रधान मोदींनी दीं पुतिन यांच्याकडे केलेली विनंती मान्य झाली आहे. रशियामध्ये गेलेले भारतीय ज्यांना लष्करामध्ये भरती करून घेण्यात आले होते त्या सर्वांना सोडण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे.  त्यामुळे हा भारत सरकारसाठी मोठा विजय मानावा लागेल.

रशियामध्ये अनेक भारतीय कामानिमित्त गेले होते. त्यातील अनेकांना बळजबरीने रशियाच्या लष्करामध्ये भरती करण्यात आले होते. शिवाय त्यांना रशिया-युक्रेन युद्धामध्ये युद्धभूमीवर पाठवले जात होते.

याबाबत पंतप्रधान मोदी यांनी पु्तिन यांच्याकडे शब्द टाकला होता. त्यानंतर पुतिन यांनी रशियाच्या लष्करातील सर्व भारतीयांना सोडण्याचा आणि त्यांना परत मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींच्या दीं रशिया भेटीचे हे मोठे फलित आहे असं म्हणता येईल.

युक्रेन-रशिया युद्धामध्ये भारतीय तरुणांचा बळी जात होता. कामानिमित्त गेलेल्या भारतीय तरुणांना रशियाकडून लष्करात भरती करून घेतले जात होते. याबाबत भारताने रशियाकडे मुद्दा उपस्थित केला होता. भारतातूनही याबाबत सरकारवर दबाव वाढला होता.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी रशियाचे त्यांचे समकक्ष सर्जेव लावरोव यांच्याकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर भारताच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हणण्यात आलं होतं की, रशियाच्या लष्करात काम करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांचा युद्धादरम्यान मृत्यू झाला आहे.

त्यानंतर भारत सरकारने याबाबत गांभीर्याने विचार सुरू केला होता. भारतीय तरूणांनी दुसऱ्याच्या युद्धात काम करावं किंवा जीव द्यावा हे योग्य नाही. हे कधीही स्वीकारले जाऊ शकत नाही, असं एस जयशंकर म्हणाले होते.

मोठ्या रकमेचे आमिष दाखवून भारतीयांना रशियाच्या लष्करात भरती करण्यात आले होते. पण, त्यानंतर त्यांना सीमेवर पाठवण्यात आले. काही तरूणांनी व्हिडिओच्या माध्यमातून भारत सरकारकडे मदतीची याचना केली होती. माहितीनुसार, आतापर्यंत १० भारतीय मायदेशी परत आले आहे. २० पेक्षा जास्त रशियाच्या लष्करामध्ये भरती झालेले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group