रशिया-युक्रेन युद्ध जागतिक पातळीवर महत्त्वाचा मुद्दा झाला असून या दोन देशातील वाद आता आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला आहे. या देशांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन गट पडले आहे. हे युद्ध रोखणं हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. पण ट्रम्प यांना यात यश येताना दिसत नाहीये. कारण गेल्या २४ तासात रशियाने युक्रेनवर ५२४ हवाई हल्ले केले आहेत.
रशियाने युक्रेनच्या तीन शहरांवर अक्षरक्ष: दारुगोळ्याचा वर्षाव केला. संपूर्ण युक्रेन रशियाच्या या हल्ल्यांनी हादरुन गेला आहे. मागच्या काही महिन्यातील रशियाने युक्रेनवर केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुतिन यांनी हल्ला युक्रेनवर केला. पण संदेश नाटो देशांना दिला. युक्रेनवर इतका मोठा विध्वंसक हल्ला करुन पुतिन यांनी नाटोला शेवटचा इशारा दिला आहे. रशियान सीमेजवळ युद्धाभ्यास बंद झाला नाही, तर पुढच्या काही दिवसात महायुद्ध निश्चित आहे.
युक्रेनी सैन्यानुसार, रशियाने 18 नोव्हेंबरच्या संध्याकाळी ६ वाजल्यापासून युक्रेनवर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि मिसाइल हल्ले सुरु केलेत. 19 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत हे हवाई हल्ले सुरु होते. रशियाने युक्रेनच्या तीन शहरांना टार्गेट केलं. कीव, टेरनोपील आणि खारकीव या तीन शहरांवर रशियाची हवाईशक्ती तुटून पडली. ४६ मिसाइल्स आणि ४७६ ड्रोनव्दारे हल्ले करण्यात आले. रशियाने थेट क्रूझ मिसाइल्स डागली. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, त्यावेळी एक ड्रोन रोमानियाच्या एअरस्पेसमध्ये घुसलं.
रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यात आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाने जाणुनबुजून गृह, शिक्षण सुविधा आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं. जास्तीत जास्त नागरिकांना मारणं हे त्यांचं लक्ष्य होतं असा दावा युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेंको यांनी केला.