"सॉरी मम्मी, पप्पा मी हरली" परीक्षेच्या एक दिवस आधीच 18 वर्षांच्या मुलीनं संपवलं आयुष्य
img
Dipali Ghadwaje
देशभरातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमातून तणावापासून दूर राहण्याचा सल्ला देत असताना दुसरीकडे  राजस्थानमधील कोचिंग क्लासचे शहर म्हणून ओळख असलेल्या कोटा मध्ये आणखी एका विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली.ही विद्यार्थीनी जेईई मेन परीक्षेची तयारी करत होती. 30 जानेवारी रोजी JEE मुख्य परीक्षा होती. निहारिका सिंह असे या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव होते. ती बारावीमध्ये शिकत होती. 

विद्यार्थिनीच्या खोलीत एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात तिने लिहिले आहे की, 'माफ करा आई आणि बाबा, मी जेईईची तयारी करू शकले नाही, त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे.' 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवमंदिर 120  फूट रोड बोरखेडा येथील रहिवासी विजय सिंह यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांची मुलगी निहारिका ही 18 वर्षांची होती. बारावीत शिकत होती.तिची जेईई अॅडव्हानसची मंगळवारी परीक्षा होती. मात्र, तिने आज सोमवारीच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास  घेतलेल्या अवस्थेत असलेल्या निहारिकाला तातडीने  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

अभ्यासामुळे ती तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. कुटुंबीयांच्या जबाबानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

सुसाईड नोटमध्ये काय?
निहारिकाने आत्महत्येपूर्वी  सुसाईड नोट लिहून ठेवली होती. 'मम्मी, पप्पा, मी जेईई करू शकलो नाही, म्हणूनच मी आत्महत्या करत आहे, मी हरली आहे, मी चांगली मुलगी नाही. माफ करा आई आणि बाबा, असे निहारिकाने सुसाईड नोटमध्ये म्हटले. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group