पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील विक्रमी विजयानंतर पीएम मोदी कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत.
या दौऱ्यादरम्यान ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. नौसेनेच्या दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत.
दरम्यान पीएम मोदी महायुतीच्या आमदारांना काय कानमंत्र देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पीएम मोदी १५ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे तीन प्रमुख नौदल युद्धनौका INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर यांचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील.
या दौऱ्यादरम्यानच ते महायुतीच्या आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. नवी मुंबईतील खारघर येथे श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन पीएम मोदी करणार आहेत.
९ एकरमध्ये पसरलेल्या या प्रोजेक्टमध्ये अनेक देवी- देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालय आणि सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे.