बांगलादेशातील सतखीरा येथे माँ कालीचे जेशोरेश्वरी मंदिर खूप प्रसिद्ध आहे. 2021 मध्ये पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला भेट दिली तेव्हा त्यांनी त्या मंदिरात माँ कालीचा मुकुट अर्पण केला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेला हा मुकूट मंदिरातून चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , गुरुवारी दुपारी मंदिरातून सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा मुकुट चोरीला गेला आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही चोरांची ओळख पटवण्यासाठी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यादरम्यान 27 मार्च 2021 रोजी जेशोरेश्वरी मंदिराचा दौरा केला होता. त्या दिवशी त्यांनी प्रतिकात्मक म्हणून देवीच्या डोक्यावर मुकुट घातला.
भारताने व्यक्त केली चिंता
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी माँ कालीच्या मुकुटाच्या चोरीच्या घटनेवर चिंता व्यक्त केली. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालय तपास यंत्रणांच्या संपर्कात आहे.