खळबळजनक ! सोनं चोरायचा अन बँकेत द्यायचा... पुढे करायचा असं काही की...
खळबळजनक ! सोनं चोरायचा अन बँकेत द्यायचा... पुढे करायचा असं काही की...
img
वैष्णवी सांगळे
रत्नागिरीतून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शिपायानेच दागिने चोरून त्यावर ३५ लाखांचे कर्ज काढल्याने शहरात खळबळ उडाली आहे.  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ता शाखेतून गायब झालेल्या ५० लाखांच्या ५०४.३४ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा शोध शहर पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणात संशयित शिपाई अमोल आत्माराम मोहिते (४२, रा. टिके, रत्नागिरी) याने चोरलेले दागिने रत्नागिरीतील विविध बँकांमध्ये तारण ठेवून ३५ लाखांचे कर्ज घेतल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहिते याने एका बँकेतून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेत दागिने तारण ठेवून पुन्हा कर्ज काढले. अशा प्रकारे वारंवार कर्ज घेऊन अखेर संपूर्ण रक्कम खर्च केली. शहर पोलिसांनी संबंधित बँकांना याबाबत नोटीस जारी केली आहे. यापूर्वी पोलिसांनी संशयिताच्या घरी झडती घेतली असता २ तोळे सोने हस्तगत केले होते. मात्र, उर्वरित दागिने त्याने विविध बँकांत गहाण ठेवले होते. याबात पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 

याबात पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. तर या अपहार प्रकरणात शिपायासोबतच बँकेचा कॅशियर आणि शाखाधिकारी यांच्या संगनमताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कर्ला शाखेचे शाखाधिकारी किरण बारये यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group