लोकसभा निवडणूक : शरद पवारांनी भरसभेत ऐकवली मोदींच्या भाषणाची
लोकसभा निवडणूक : शरद पवारांनी भरसभेत ऐकवली मोदींच्या भाषणाची "ती" ऑडिओ क्लिप
img
Dipali Ghadwaje
राज्यामध्ये  एकीकडे  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या सभा, बैठका आणि रॅलींचा धडाका सुरू आहे. अशात माढा येथे शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान शरद पवारांनी मोदींनी दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचत टीकास्त्र सोडलंय.

काय म्हणाले शरद पवार ?

मोदींनी २०१४ साली पन्नास दिवसांच्या आत पेट्रोलची किंमत ५० टक्के खाली आणणार, असं आश्वासन दिलं होतं. मात्र पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 

गॅस ११०० रूपये झाला आहे. २०१४ साली मोदींनी बेकारी कमी करून हाताला काम देऊ असं सांगितलं होतं, परंतु बेकारी कमी झाली नाही. १०० पैकी ८७ तरुण बेकार आहेत, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींनी दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचत टीकास्त्र सोडलंय.

माढा येथे शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेत उपस्थितांना संबोधित करताना शरद पवारांनी असं म्हटलं आहे. तसेच मोदींनी आजवर गॅस, वीज, तरुणांना रोजगार याबाबत दिलेल्या आश्वासनांची ऑडिओ क्लिप देखील पवारांनी भरसभेत सर्वांना ऐकवली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group