मुंबईतील शिवाजी पार्कवर आज महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर पाच मागण्यादेखील मांडल्या.
ते म्हणाले पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहे. यामुळे मी त्यांच्यापुढे काही मागण्या मांडतो आहे. पहिलं म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा.
दुसरं म्हणजे शिवाजी महाराजांचे गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती नेमावी. तिसरं म्हणजे शालेय शिक्षणात शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम समावेश करावा.
चौथं म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरीत पूर्ण करावे आणि शेवटचं म्हणजे देशातील मुठभर देशद्रोही मुस्लीमांच्या अड्ड्यांवर छापा टाकून देश सुरक्षित करावा, असे राज ठाकरे म्हणाले.