पंतप्रधान मोदी लवकरच पाकिस्तानला जाणार? तब्बल ८ वर्षांनंतर मोदींना निमंत्रण ; नेमकं काय कारण?
पंतप्रधान मोदी लवकरच पाकिस्तानला जाणार? तब्बल ८ वर्षांनंतर मोदींना निमंत्रण ; नेमकं काय कारण?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : भारत पाकिस्तानमधील तणावाचं वातावरण जगजाहीर आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानकडून पंतप्रधान मोदींना भेटीचं निमंत्रण मिळालंय. तब्बल ८ वर्षांनंतर मोदींना पाकिस्तानकडून निमंत्रण मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

पाकिस्तानकडून PM मोदींना भेटीचं निमंत्रण पाकिस्तानचं पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान भेटीचं निमंत्रण दिलंय. शाहबाज शरीफ यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या इतर नेत्यांसह पंतप्रधान मोदींना देखील यंदा आमंत्रित केलंय. कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंटच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

पाकिस्तानी वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार ही बैठक १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मागील आठ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांना पाकिस्तानने आमंत्रित केलंय. भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक दिवसांपासून तणाव सुरू आहे. तरीही भारत आणि पाकिस्तानमध्ये सहकार्य करण्यात यश मिळताना दिसतंय. 

पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी२०२३ मध्ये भारतात झालेल्या एका बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी भारताच्या बाजूने आता या बैठकीला कोण उपस्थित राहणार? याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group