तारीख ठरली! पंतप्रधान मोदींची 'मन की बात' ; या तारखे पासून होणार सुरू
तारीख ठरली! पंतप्रधान मोदींची 'मन की बात' ; या तारखे पासून होणार सुरू
img
Dipali Ghadwaje
एनडीए सरकारचा कार्यकाळ सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्विकारला आहे. मागील काही दिवसांपासून आचारसंहितेमुळे पंतप्रधान मोदींचा 'मन की बात' कार्यक्रम बंद होता. परंतु आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेच्या भेटीला येणार आहेत. ३० जून रोजी मोदी पुन्हा जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा १११ वा भाग ३० जून रोजी आहे. पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांकडून कल्पना आणि सूचना मागवल्या आहेत. हा भाग खूप खास असणार आहे. कारण नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर हा पहिलाच भाग आहे. मागील काही दिवसांपासून आचारसंहितेमुळे पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम प्रसारित होत नव्हता.

पंतप्रधानांचा जनतेशी संवाद 'मन की बात' हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवर प्रकाशित होणारा एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान देशातील महत्त्वाच्या विषयांवर आणि मुद्द्यांवर बोलतात. हा शो ९ वर्षांपूर्वी ३ ऑक्टोबर २०१४ ला लॉन्च झाला होता. हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रसारित केला जातो.


'मन की बात' चा उद्देश?

देशवासीयांशी थेट संवाद साधून देशाच्या विकासाची माहिती देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी स्वतः जनतेशी संपर्क साधतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात आचारसंहितेमुळे पंतप्रधान मोदींचा मन की बात कार्यक्रम प्रसारित होत नव्हता. यावेळी पुन्हा एनडीएने सरकार स्थापन केलं आहे. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नवीन सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच हा भाग प्रसारित होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group