भाजपाला मोठा झटका;
भाजपाला मोठा झटका; "हा" मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
img
दैनिक भ्रमर
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्याचवेळी विदर्भातील बडा नेता भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा नेता भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. भंडारा-गोंदियाचे भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले हे आज काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. वरिष्ठ नेत्यांकडून झालेले दुर्लक्ष आणि पक्षाकडून सुरू असलेल्या अवहेलनामुळे ते भाजपमधून बाहेर पडलेले आहेत. 

काही दिवसांपूर्वी शिशुपाल पटले यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली नव्हती. त्यांनी राजीनामा दिल्यावर भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते यशस्वी ठरले नाही. शिशुपाल पटले यांचा काँग्रेस प्रवेश भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे.आता शिशूपाल पटले हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. 2004 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केले होते.

शिशुपाल पटले यांचे भंडारा -गोंदीया मतदारसंघात मोठे वर्चस्व आहे. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजप सोबत एकनिष्ठ राहिले होते. परंतु वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना डावलले गेले. त्यामुळे ते भाजपमध्ये नाराज झाले. पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे, असा आरोप करत त्यांनी 25 जुलै रोजी भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group