......अन् अमोल कीर्तिकरांनी वाकून केला नमस्कार ; मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?
......अन् अमोल कीर्तिकरांनी वाकून केला नमस्कार ; मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
मुंबई: राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे. हा राज्यातील मतदानाचा पाचवा आणि अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. वायव्य मुंबईत ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्यात सामना आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला होता. त्यानंतर आज मतदानाच्या दिवशीही अमोल कीर्तिकर यांच्या वक्तव्यामुळे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 

अमोल कीर्तिकर यांनी सोमवारी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. याच मतदान केंद्रावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक मतदानासाठी आले होते.

राम नाईक आणि अमोल कीर्तिकर हे दोघे मतदान केंद्रावर समोरासमोर आले. त्यावेळी अमोल कीर्तिकर खाली वाकत राम नाईक यांच्या पाया पडले. यानंतर अमोल कीर्तिकर निघून जात असताना राम नाईक यांनी त्यांना पुन्हा बोलावून घेतले. यानंतर दोघांनी मिळून फोटो काढला.

वडिलांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी: अमोल कीर्तिकर

अमोल कीर्तिकर यांनी मतदानासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी 'एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी आपले वडील गजानन कीर्तिकर यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मला वडिलांची उणीव जाणवली. गेल्या तीन टर्मपासून माझे वडील गजानन कीर्तिकर हे वायव्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार होते. तेव्हा ते उमेदवार म्हणून जबाबदारी सांभाळायचे तर मी त्यांना बॅक सपोर्ट द्यायचो. यावेळी दोन्ही जबाबदाऱ्या मी पार पडत होतो. त्यामुळे नक्कीच माझा दमछाक झाली. पण वडील सोबत नसले तरी मविआतील जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी प्रेमाने आणि मायेने साथ दिली, असे अमोल कीर्तिकर यांनी म्हटले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group