लखनौ (भ्रमर वृत्तसेवा) :- भारतीय जनता पक्षाचे हाथरस लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार राजवीर दिलेर यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने समर्थकांसह कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
हाथरसमधील भाजप खासदार राजवीर सिंग दिलर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. 2019 मध्ये हाथरस लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र यावेळी पक्षाच्या हायकमांडने त्यांना तिकीट दिले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि तळागाळातील त्यांच्या कार्यासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे, त्यांच्या निधनाने पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मोदींनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
राजवीर दिलर हे मूळचा अलिगढचे रहिवासी होते. 2017 मध्ये भाजपने त्यांना इगलस विधानसभेतून उमेदवार म्हणून उभे केले आणि विक्रमी मतांनी विजयी होऊन ते विधानसभेत पोहोचले. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक येताच त्यांना राजेश दिवाकर यांचे तिकीट कापून उभे केले आणि त्यांनी 260208 मतांनी निवडणूक जिंकली होती.
यावेळी भारतीय जनता पक्षाने त्यांचे तिकीट रद्द केले आणि त्यांच्या जागी राज्य सरकारचे महसूल मंत्री अनुप वाल्मिकी यांना उमेदवारी दिली. दरम्यान, या मतदारसंघासाठी येत्या 7 मे ला मतदान होणार आहे. पण त्याआधीच राजवीर दिलेर यांच्या निधनामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दिलेर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.