राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजेपासून सुरू झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदानाची नोंद झाली.
संपूर्ण देशाच्या तुलनेत हे सर्वात कमी मतदान आहे. यामुळे मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून लोकशाहीच्या या सोहळ्यात सहभाग घ्यावा असं आवाहन केलं जात आहे.
महाराष्ट्रात कुठे-किती मतदान?
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे -
लातूर - ७.९१ टक्के
सांगली - ५.८१ टक्के
बारामती - ५.७७ टक्के
हातकणंगले - ७.५५ टक्के
कोल्हापूर -८.०४ टक्के
माढा -४.९९ टक्के
उस्मानाबाद -५.७९ टक्के
रायगड -६.८४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के
सातारा -७.०० टक्के
सोलापूर -५.९२ टक्के
देशातील 11 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यातील पश्चिम बंगालमध्ये पहिल्या दोन तासांमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटनाही पहायला मिळत आहेत. मात्र तरीही मोठ्या संख्येने लोक बाहेर पडून मतदान करत आहेत.
कुठे-किती मतदान?
सकाळी नऊ वाजेपर्यंतची देशातील मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.
आसाम - 10.12%
बिहार - 10.41%
छत्तीसगड - 13.24%
दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 10.13%
गोवा - 13.02%
गुजरात - 9.87%
कर्नाटक - 9.45%
मध्य प्रदेश - 14.43%
महाराष्ट्र - 6.64%
उत्तर प्रदेश - 12.94% प
श्चिम बंगाल - 15.85%