चंद्राबाबू नायडूंनी चौथ्यांदा घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
चंद्राबाबू नायडूंनी चौथ्यांदा घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
img
Dipali Ghadwaje
नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीने बहुमत मिळवलं आहे. टीडीपीने ही निवडणुक प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते पवन कल्याण आणि भाजपाबरोबरच्या युतीत लढली होती. बहुमत मिळवल्यानंतर या तीन पक्षांच्या युतीने आज राज्यात सरकार स्थापन केलं असून चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.  

नायडू यांच्याबरोबर अभिनेते पवन कल्याण यांनीदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नायडू यांनी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच ते या राज्याचे १३वे मुख्यमंत्री झाले आहेत. विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळ केसरपल्ली आयटी पार्कमध्ये आज (१२ जून) सकाळी हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.


नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत राज्यात टीडीपी, जनसेना पार्टी आणि भाजपाने इंडिया आघाडीचा पराभव केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस यांचा देखील पराभव केला आहे. 

विजयवाडा येथे मंगळवारी एनडीएच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत चंद्राबाबू नायडू यांची एनडीएचे गटनेते म्हणून निवड झाली. त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नायडू यांच्याबरोबर एनडीएतील एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये टीडीपीचे २०, जनसेना पार्टीचे २१ आणि भाजपाच्या एका नेत्याचा समावेश आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group