वंचित बहुजन आघाडी उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन : करण गायकर, मालती थविल यांचे उमेदवारी अर्ज दाखल
वंचित बहुजन आघाडी उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन : करण गायकर, मालती थविल यांचे उमेदवारी अर्ज दाखल
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी)  : छावा क्रांती सेनेचा विजय असो... बोलो बोलो जय भीम.. छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी जय शिवराय..... नासिक का खासदार कैसा हो करण गायकर जैसा हो.... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.... गायकर, थविल तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा विविध शाहू आंबेडकरांचा विजय असो... लोकसभेत निवडून येणार कोण करण गायकर शिवाय आहेच कोण... भारतीय राज्यघटनेचा विजय असो.... अशा विविध घोषणा देत शक्तिप्रदर्शन करीत वंचित बहुजन आघाडी, छावा क्रांती सेनेचे नासिक लोकसभा निवडणुकीचे उमेदवार करण गायकर व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मालती थविल यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बी. डी. भालेकर मैदान येथून निघालेल्या प्रचार रॅलीमध्ये सजविलेल्या उघड्या वाहनावर उमेदवार करण गायकर व मालती थवे यांच्यासह पवन पवार, किरण डोके, विकास सकाळे, वामन गायकवाड, प्रकाश मोरे, ज्ञानेश्वर वाबळे  आदी मान्यवर विराजमान होते. शक्तिप्रदर्शनासाठी काढलेल्या या रॅलीमध्ये असंख्य युवक दुचाकी वाहने, कार, ट्रक, टेम्पो, जीप आदी वाहनांसह सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला डोक्यावर टोपी, गांधी टोपी, पक्षाचे ध्वज, उपरणे, स्कार्फ, तसेच बाळासाहेब आंबेडकर, उमेदवार करण गायकर, मालती थविल आदींचे कटआऊट व प्रतिमा घेऊन घोषणा देत सहभागी झाले होते.

बी. डी. भालेकर मैदान येथून निघालेली प्रचारफेरी त्र्यंबक रोड, जीपीओ ऑफिस, गंजमाळ चौक, शालिमार चौक शिवाजी रोड, मेनरोड, धुमाळ पॉईंट, एम. जी. रोड, मेहेर चौक आदी शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आली. यावेळी निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक लोकसभा मतदारसंघाकरिता वंचित बहुजन आघाडी छावा क्रांती सेनेचे उमेदवार करण गायकर, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मालती थविल यांनी उमेदवारी आणि अर्ज दाखल केले.

या रॅलीमध्ये विजय गांगुर्डे, योगेश जाधव, मंगेश तूपसुंदर, कुणाल साळवे, आप्पा अवसर, बाळासाहेब साळवे, गजानन कुमावत, शुभम आदमाने, अमोल बोराडे, विलास सकाळे, दादा जोगदंडे, वैभव दळवी, अमोल देवरे, किरण बोरसे, अमोल जगळे, शिवम देशमुख, सचिन जाधव, रोहित गायकवाड, सय्यद, रेखा दिवे, माधुरी साहेबराव शिंदे, विजय कटारे, वामन गायकवाड, प्रकाश मोरे, ज्ञानेश्वर वाबळे, रवी पगारे, दीपक पगारे, ऊर्मिला गायकवाड, नीतू सोनकांबळे, मनोरमा पाटील, संगीता सूर्यवंशी, संगीता वाघ, रेखा पाटील, निर्मला नारखेडे, दीपाली लोखंडे, पुष्पा जगताप, काजल देवरे, मनीषा पाटील, केशरबाई सोनार आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group