सकाळी नऊपर्यंत कुठे-किती मतदान?
सकाळी नऊपर्यंत कुठे-किती मतदान?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. राज्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे. भिवंडीत सर्वात कमी (४.८६ टक्के) मतदानाची नोंद झाली आहे. तर पालघरमध्ये सर्वाधिक (७.९५ टक्के) मतदान झाले आहे.

दक्षिण मुंबईमध्ये सर्वात कमी ५.३४ मतदानाची नोंद झाली आहे. इतिहासात दक्षिण मुंबईसारख्या उच्चभ्रू भागात मतदानाचा आकडा कायमच कमी राहिला आहे. त्यातही वरळीत अवघ्या २.८६ टक्के मतदानाची नोंद आहे. तर मलबार हिलमध्ये ८.१५ टक्के मतदान झालंय. विशेष म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ ठाकरेंकडे, तर मलबार हिल भाजपकडे असल्याने निकालात काय परिणाम दिसणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळी नऊ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सरासरी मतदान - ६.३३ टक्के

भिवंडी - ४.८६
धुळे - ६.९२
दिंडोरी - ६.४०
कल्याण - ५.३९उत्तर मुंबई - ६.१९
उत्तर मध्य मुंबई - ६.०१
ईशान्य मुंबई - ६.८३
वायव्य मुंबई - ६.८७
दक्षिण मुंबई - ५.३४
दक्षिण मध्य मुंबई - ७.७९
नाशिक - ६.४५
पालघर - ७.९५
ठाणे - ५.६७

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group