मतदानाआधी मोठी खळबळ! कचराकुंडीमध्ये आढळली शेकडो मतदान कार्डं ; नेमकं प्रकरण काय?
मतदानाआधी मोठी खळबळ! कचराकुंडीमध्ये आढळली शेकडो मतदान कार्डं ; नेमकं प्रकरण काय?
img
DB
लोकसभा निवडणुकीमधील मतदानाला अवघे चार दिवस बाकी असतानाच जालना शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. शहरामधील नूतन वसाहत भागामध्ये रस्त्याच्या बाजूला शेकडो मतदान कार्ड अज्ञात व्यक्तीने फेकून दिल्याचा प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

जालना लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे मात्र शहरातील मुख्य वस्तीमध्ये नूतन वसाहत भागात कचराकुंडी मध्ये शेकडो मतदान कार्ड नागरिकांना आढळून आली आहेत. त्यामुळे जालना लोकसभा निवडणुकीतील मतदानाला अवघे चार दिवस बाकी असताना जालना शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group