मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! युवासेनेत मोठी फूट ; अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! युवासेनेत मोठी फूट ; अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
img
DB
लोकसभा निवडणुकाची धामधुम सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुणे शहर शिवसेना शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर आली असून शिवसेना पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत विचारात घेतले नसल्याची नाराजी व्यक्त करत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. 

मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुतीकडून पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. अशातच शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे तसेच पक्षाचा ग्रुपही सोडल्याची बातमी समोर आली आहे. 

लोकसभा निवडणूक संपताच पुण्यातील गटात धुसफुस समोर आली असून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच युवासेनेतील आणखी पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेनेची फादर बॉडी ही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या धामधुमीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group