लोकसभा निवडणूक: पहिल्या चार टप्प्यात एकूण
लोकसभा निवडणूक: पहिल्या चार टप्प्यात एकूण "इतके" टक्के मतदान
img
Dipali Ghadwaje
देशभरात सध्या लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे. महाराष्ट्रात 20 मे दिवशी पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे.  लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणारा दूरध्वनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे  राष्ट्रीय आयकॉन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याकडून तुम्हाला आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मतदार जनजागृतीचा भाग म्हणून  केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता अशी अनेक पावले उचलली आहेत. 

[Poll ID="null" title="undefined"] सुमारे 66.95% मतदान झाले आहे. सध्या सुरु असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये जवळपास 45 कोटी 10 लाख लोकांनी मतदान केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी लक्ष्यीत हस्तक्षेपात वाढ केली आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासह मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांच्या 5व्या, 6व्या आणि 7व्या टप्प्यात सर्व मतदारांना माहितीची पावती वेळेवर वितरित होईल, याची सुनिश्चिती करण्याचे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या उपक्रमांना अधिक गती देण्याचे निर्देश राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

"मतदार जनजागृतीमध्ये भागीदारी आणि सहयोग हे अत्यावश्यक आधारस्तंभ आहेत, असे आयोगाला ठामपणे वाटते. आयोगाच्या विनंतीनुसार, जनमानसावर पगडा असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती, प्रभावशाली  व्यक्ती, विविध संस्था जनकल्याणासाठी मोठ्या उत्साहाने काम करत आहेत, ही खूप आनंदाची  बाब आहे,"असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे. 

भारतीय मतदारांकडून मोठ्या प्रमाणात मतदान हा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याबद्दल जगाला संदेश ठरेल, असे ते म्हणाले. मतदानाचा दिवस सुट्टीचा नाही तर अभिमानाचा दिवस असल्याने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी सर्व मतदारांना केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group