ऐन निवडणुकीत पालघरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. भाजपच्या मुंबईतील कार्यालयात प्रवेश सोहळा झालेला आहे. यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालघरमधून यंदा शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने गावित नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी केली आहेत. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे.
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार राजेंद्र गावित म्हणाले की, मी देवेद्रं फडणवीस आणि बावनकुळे यांचे आभार व्यक्त करतो. २०१८ ची निवडणूक चुरशीची झाली. उद्धव ठाकरेंनी तेव्हा मागणी केली होती की, पालघरची जागा आम्हांला पाहिजे. आता मी शिंदे गटातून खासदार म्हणून काम केलं आहे. आता फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. आज मी घरवापसी करत आहे. याचा आनंद होत असल्याचं म्हणत गावित यांनी मुख्यमंत्र्यांना देखील धन्यवाद व्यक्त केले आहेत.