६ मे २०२४
नाशिक [भ्रमर प्रतिनिधी) :- लोकसभा निवडणूक प्रक्रियेत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आज सोमवारी नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठी बंडखोर उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, भारतीय जनता पार्टीचे बंडखोर उमेदवार अनिल जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला,
तर दिंडोरी लोकसभा मतदार संघातील महायुतीतील भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासाठी भाजपचे बंडखोर उमेदवार माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी माकपाचे बंडखोर उमेदवार माजी आमदार जिवा गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतली.
Copyright ©2026 Bhramar