लोकसभेच्या निकालापूर्वीच राजकीय हालचालींना वेग, भाजपचा माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला
लोकसभेच्या निकालापूर्वीच राजकीय हालचालींना वेग, भाजपचा माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला
img
Dipali Ghadwaje
मुंबई : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेच्या निकालावर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच बरीच गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे उद्याच्या निकालानंतर महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे आकाराला येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

मात्र, आता लोकसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच आमदारकीसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांनी संबंधित पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या निकालापूर्वीच विधानसभेची उमेदवारी निश्चित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये हालचाली सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीतील एन्ट्रीमुळे  भाजपकडून संभाव्य उमेदवारी मिळणार नसल्याची शक्यता लक्षात घेत माजी आमदारांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक साधायला सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे उद्गीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुधाकर भालेराव हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. सध्या उद्गीर विधानसभेत राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार आहेत. सुधाकर भालेराव आणि शरद पवार यांच्यातील चर्चेचा नेमका तपशील उपलब्ध झालेला नाही.

मात्र, महायुतीत सध्याच्या आमदारांनाच पुन्हा विधानसभेची तिकीट मिळण्याची शक्यता लक्षात घेत माजी आमदारांनी पर्यायांची चाचपणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group