२५ जून २०२४
लोकसभा अध्यक्ष पदाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशामध्ये आता लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. स्वातंत्र्यानंतर इतिहासामध्ये पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदााठी निवडणूक होणार आहे.
लोकसभा अध्यक्षपदावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. कारण एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्ही पक्षांनी लोकसभाअध्यक्षपदासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
ओम बिर्ला यांचे नाव भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने निश्चितकेले आहे. ओम बिर्ला यांनी आज लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे, इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचे नाव निश्चित करण्यात आले. काँग्रेसचे खासदार के सुरेश यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला.
Copyright ©2024 Bhramar