ऐन निवडणुकीच्या काळात संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, समोर आली
ऐन निवडणुकीच्या काळात संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, समोर आली "ही" मोठी बातमी
img
Dipali Ghadwaje
अहमदनगर : ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्य करणं संजय राऊतांना भोवलं आहे. त्यांच्यावर आठ दिवसांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

संजय राऊत यांच्या विरोधात अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेब आणि नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला असा दावा संजय राऊत यांनी केला होता.

नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी 8 मे रोजी अहमदनगर मध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. दोन गुजराती लोकांना महाराष्ट्राबद्दल राग आहे. ते सुडाचं राजकारण करत आहेत असं राऊत म्हणाले होते.

राऊत म्हणाले होते की, आपल्याला इतिहासामध्ये जावे लागेल. औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला होता तेथील माती औरंगजेबाची माती आहे. त्या मातीतील हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेबाचा जन्म आणि नरेंद्र मोदी यांचा जन्म दावत मध्ये झाला आहे. औरंगजेब तिथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी औरंगजेब्याच्या वृत्तीने हे दोन व्यापारी वागत आहेत.

एका औरंगजेबाला महाराष्ट्र मध्ये आम्ही गाडला आहे. तर तू कोण असा एकेरी उल्लेख संजय राऊत यांनी केला. या प्रकरणी अंमलदार अतुल काजळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group