लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींनी केली
लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींनी केली "ही" सर्वात मोठी घोषणा
img
Dipali Ghadwaje
दिल्ली : देशभरातील ९६ मतदार संघांमध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकांचे आणखी तीन टप्पे शिल्लक असतानाच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधतानाच महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करत सोनिया गांधी यांनी काँग्रेस सरकार सत्तेत येताच महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

काय म्हणाल्यात सोनिया गांधी? 

नमस्कार माझ्या प्रिय बहिणींनो. स्वातंत्र्य लढ्यापासून ते आधुनिक भारताच्या निर्मितीत महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र, आज महिलांसमोर प्रचंड महागाईचे संकट उभे आहे. त्यांच्या मेहनतीला आणि तपश्चर्येला न्याय देण्यासाठी काँग्रेसने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. काँग्रेसच्या 'महालक्ष्मी' योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेला आम्ही दरवर्षी 1 लाख रुपये देणार आहोत, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

महालक्ष्मी योजनेची घोषणा तसेच आमच्या या गॅरंटीने कर्नाटक आणि तेलंगणामधील कोट्यवधी कुटुंबांचे जीवन आधीच बदलून टाकले आहे. मनरेगा असो, माहितीचा अधिकार असो, शिक्षणाचा अधिकार असो किंवा अन्न सुरक्षा असो काँग्रेस पक्षाने आमच्या योजनांद्वारे कोट्यवधी भारतीयांना बळ दिले आहे. महालक्ष्मी योजना ही आपले कार्य पुढे नेण्याची नवीन गॅरंटी आहे. या कठीण काळात काँग्रेसचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि हा हात तुमची परिस्थिती बदलेल, असा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छिते, असे सोनिया गांधी म्हणाल्यात. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group