दिल्लीत मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, वेलकम परिसरात जनता मजदूर कॉलनीत ४ मजली इमारत कोसळली. आतापर्यंत सुमारे १२ जण ढिगाऱ्यात अडकल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , अपघातावेळी इमारतीत अनेक लोक उपस्थित होते. घटना घडल्यानंतर बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
स्थानिक प्रशासनासह ७ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित झाल्या आहेत. आतापर्यंत सुमारे ५ जणांना ढिगाऱ्यााखालून बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
जखमींना तातडीने रूग्णवाहिकेतून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य अजूनही सुरू आहे.
ज्या भागात ही दुर्घटना घडली. त्या भागातील रस्ते खूपच अरूंद आहेत. अशा परिस्थित पथकाला बचावकार्य करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथकाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच इतर रहिवाशांना देखील ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात येईल.