दिल्लीमधील वसंतकुंज आश्रमातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वसंतकुंज आश्रमात मुलींसोबत अश्लील वर्तन केल्याचा १७ मुलींकडून आरोप करण्यात आला आहे. आरोप झाल्यानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार झाला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा दिल्लीमध्ये वसंतकुंज येथे एका प्रसिद्ध आश्रमात संचालक पदावर काम करत होता. आश्रमातील मुलींचा विनयभंग, अश्लील मेसेज केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपीचे नाव चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी असे आहे. त्याच्या Volvo कारमधून बनावट 39 UN 1 नंबर मिळाला आहे.पोलिसांनी गाडी जप्त केली आहे.
फरार स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचा शोध पोलीस करत आहेत. आश्रम प्रशासनाने स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला पदावरून काढून टाकले आहे. दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचा फोटोही जारी केला आहे. स्वामी चैतन्यानंद सरस्वती याने अटकेच्या भीतीने पळ काढला आहे. पोलिसांकडून त्याचा तपास केला जात आहे.
त्याचं अखेरचे लोकेशन आग्रा येथे असल्याचे तपासात समोर आले. दिल्ली पोलिसांनी याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांकडे संपर्क केला आहे. दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून संयुक्त ऑपरेशन करण्यात येतेय. दरम्यान, या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पीडित मुलींचा जबाब नोंदवण्यात आला आहे.