फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांच्याकडून तडकाफडकी संसद विसर्जित; निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर
फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांच्याकडून तडकाफडकी संसद विसर्जित; निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रोन यांनी देशाची संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच देशात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. युरोपीयन युनियनच्या संसदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाच्या खराब कामगिरीनंतर मॅक्रोन यांनी हा निर्णय घेतलाय.

एक्झीट पोलमध्ये कट्टर उजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅली पक्षाचा ३१.५ टक्के मतं घेऊन विजय होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही मतं मॅक्रोन यांच्या Renaissance Party ला मिळालेल्या मतांपेक्षा दुप्पट आहेत. मॅक्रोन यांच्या पक्षाला केवळ १५.२ टक्के मतं मिळाली आहेत. सोशलिस्ट पक्षाला १४.३ टक्के मतं मिळाली आहेत.

नॅशनल रॅली पक्षाचे नेते जॉर्डन बार्डेला यांनी फ्रान्स अध्यक्षांवर टीका केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या ईयूमधील पराभवामुळे त्यांनी विश्वास गमावलाय हे स्पष्ट आहे. इम्यॅन्यूएल मॅक्रोन यांचा काळ आता संपला आहे, असं ते म्हणाले.

मॅक्रोन यांनी एक्झीट पोलनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांची घोषणा केली. फ्रान्समध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. ३० जून आणि ७ जुलै रोजी मतदान होईल.

मॅक्रोन म्हणाले की, 'माझा निर्णय धोकादायक आहे. पण, विश्वास महत्त्वाचा आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे. ते योग्य निर्णय घेतील हे मला माहिती आहे.' फ्रान्समध्ये ५७७ जागांसाठी कनिष्ठ सभागृहातील सदस्य निवडीसाठी मतदान होईल. फ्रान्समध्ये संसद आणि अध्यक्षपदाच्या वेगवेगळ्या निवडणुका होत असतात. त्यामुळे संसदेच्या निवडणुका होत असल्या तरी मॅक्रोन यांच्या पदाला कोणताही धोका नाही. २०२७ पर्यंत ते अध्यक्षपदावर कायम असणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group