लालकिल्ल्याजवळील स्फोटानंतर चर्चेत आलेल्या फरीदाबादच्या अल-फलाह यूनिवर्सिटीच्या ठिकाणांवर प्रवर्तन निदेशालयाने छापेमारीची कारवाई केली आहे. तपास यंत्रणांनी आज दिल्लीच्या ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे मारले.
ईडीचे सकाळी ५ वाजल्यापासून अल-फलाह यूनिवर्सिटी, त्यांचे ट्रस्टीज़ आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती,संस्थांच्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे. संस्थेवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे. ईडी फंडिंगचा तपास करत आहे. व्हाइट टेरर मॉड्यूलमुळे अल फलाह यूनिवर्सिटी तपासाच्या केंद्र स्थानी आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी तपास आणि फसवणुकीसाठी विश्वविद्यालय विरूद्धच्या दोन प्रकरणांमध्ये अल फलाह विश्वविद्यालयच्या अध्यक्षांना दोन समन जारी केले होते.
विश्वविद्यालयाचे चेअरमन जावेद अहमद सिद्दीकी यांना समन जारी करणं व्यापक तपासाचा भाग आहे. मागच्या आठवड्यात लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाशी संबंधित हा तपास आहे. स्फोटाशी संबंधित असलेल्यांचा या यूनिवर्सिटीशी संबंध आहे. त्यामुळे तपास यंत्रणांना संस्थेतील रेकॉर्ड, आर्थिक आदान-प्रदान आणि प्रशासकीय मंजुरीची चौकशी करावी लागत आहे.
दिल्ली कार स्फोटाचा तपास जसा-जसा पुढे जातोय, तसं-तसे अल-फलाह युनिवर्सिटीचे प्रकरणही तापत चालले आहे. युनिवर्सिटी विस्तारात मोठ्या प्रमाणात नियमांच उल्लंघन झाल्याचे तपास यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे प्रशासनाने आता युनिवर्सिटी भोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशासनाचे लोक अलीकडेच युनवर्सिटीमध्ये गेले होते. त्यावेळी आढळून आले की, अनेक निर्माण कार्य विना मंजुरी करण्यात आली आहेत किंवा नियमांकडे डोळेझाक करण्यात आली आहे.
तपास यंत्रणांच लक्ष आता युनिवर्सिटीचे फंडींग, पैशाचे व्यवहार आणि दहशतवादाशी संबंधित लिंकवर आहे. दिल्ली पोलिसांनी युनिवर्सिटी विरोधात फसवणुकीचे दोन गुन्हे आधीच दाखल केले आहेत. सध्या सगळ्यांची नजर प्रशासनाच्या पुढच्या कारवाईवर आहे. युनिवर्सिटीतील बेकायद बांधकामावर लवकरच बुलडोझर फिरवला जाऊ शकतो. मागच्या आठवड्यात सोमवारी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आय ट्वेन्टी कारमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. यात 12 नागरिकांचा मृत्यू झाला. डॉ. उमर स्फोटाच्यावेळी कारमध्ये होता. हा आत्मघातकी दहशतवादी हल्ला आहे. डॉ. उमर पुलवामाचा रहिवाशी असल्याचे तपासात समोर आले आहे.