दिल्लीतील द्वारका येथे करण देव याच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले आहे. हे एक सुनियोजित हत्याकांड आहे. पती हा दिरासोबतच्या प्रेमसंबंधामध्ये अडचण ठरत असल्याने त्याची हत्या करण्यात आली. पत्नीने आपल्या दिराच्या म्हणजेच तिच्या प्रियकराच्या मदतीने पती करणची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
इंस्टाग्राम चॅटमध्ये हत्येची स्क्रिप्ट
रात्री उशिरा आरोपी पत्नी आपल्या दिराशी चॅट करत होती. दिर दिला काही गोष्टी सांगतो. मी घराच्या गल्लीतच आहे. तु बोलवशील तेव्हा मी येतो. पतीला किती गोळ्या देवू असं ती विचारते. त्यानंतर दिर सांगतो सगळ्या गोळ्या एकदाच देवून टाक. त्यानंतर ती सर्व गोळ्या देते. पण त्यानंतरही पतीला काही होत नाही. त्यावर ती घाबरून त्याला विचारते आता काय करायचं? त्यावर तो शॉक देण्याचं तिला सांगतो. हे सर्व इंन्स्टा चॅटवर रचलं जात होतं. एकादा का तो बेशुद्ध झाला की त्यानंतर त्याला संपवण्याचा डाव होता.
गोळ्या दिल्यानंतरही करणच्या स्थितीत जास्त बदल न झाल्याने पत्नी चिंतेत येऊन लिहिते, "खूप हळू श्वास घेतोय, चिमटा काढला तर थोडा हलला." मग समोरून दिराचा आणखी एक भयानक सल्ला येतो. तो लिहितो, "तर मग शॉक फायनल करूया, वेळ पण निघून जातोय सगळा." शॉक म्हणजे विजेचा धक्का. इंस्टाग्राम चॅटवरून हे स्पष्ट होते की, दोघांनी मिळून 'शॉक देणे हाच आता शेवटचा उपाय आहे' असे ठरवले. पत्नी म्हणते, "तू ये, सोबत मिळून कदाचित देऊ शकू." दिर उत्तर देतो, "ठीक आहे येतो, हा उठला तर अडचण होईल असं ही ती दिराला सांगते. त्यानंतर जे घडले ते वेदनादायक आहे. दोघांनी मिळून करणला विजेचा धक्का देऊन ठार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करणच्या पत्नीने त्याला आधी झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. मात्र त्यानंतर ही करणचा मृत्यू झाला नाही. मग पुढे तिने प्रियकर असलेल्या आपल्या दिरासोबत मिळून त्याला विजेचा शॉक दिला. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला जो तिचा दिर आहे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.