खळबळजनक : शिंदेंच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या ; नेमकं काय कारण? वाचा
खळबळजनक : शिंदेंच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या ; नेमकं काय कारण? वाचा
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. त्यातचा शिक्रापूरमधून दिवसा ढवळ्या खुनाची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूरचे माजी उपसरपंच आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची धारदार हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याच घराजवळ ही घटना घडली आहे. दत्तात्रय बंडू गिलबिले यांच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. शिक्रापूर येथे रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीमध्ये बसलेले होते. त्यावेळी अज्ञात आरोपींनी अचानक त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर वार केले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांच्यावर वार केल्यानंतर आरोपींनी घटना स्थळवरून पळ काढल्याची माहिती आहे. 

घटना समजल्यानंतर गिलबिले यांना तात्काळ पुणे येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे.दिवसा ढवळ्या खुनाची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.  

मालमत्तेच्या वादातून गिलबिले यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता आहे

मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. हल्लेखोर यांची नावे आणि संख्या निष्पन्न झाली आहे. पोलीस पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती आहे. दरम्यान, शिक्रापूर परिसरात घडलेल्या या घटनेनंतर आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group