"प्रत्येक कार्यकर्त्याची ही अपेक्षा असते की त्याचा नेता मोठा व्हावा" ; रुपाली चाकणकरांनी केली "ही" मोठी मागणी
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचं उत्तर विधानसभेची मुदत संपून दोन दिवस उलटल्यानंतरही मिळालेलं नाही.  त्यातच  शिंदेंनी दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतली तो मान्य असेल असं जाहीर करत एक पाऊल मागे घेण्याची भूमिका घेतली. असं असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एक नवीन मागणी कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी ही मागणी पुढे ठेवली आहे.

 नेमकी काय मागणी केली?

मुख्यमंत्रिपदासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रुपाली चाकणकरांनी, "आताच नाही तर आधीपासून दादांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही मागणी करतोय. आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हावेत. प्रत्येक कार्यकर्त्याची ही अपेक्षा असते की त्याचा नेता मोठा व्हावा. सहाजिकच आमची कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की दादा मुख्यमंत्री व्हावेत," असं मत व्यक्त केलं आहे. 

 अजित पवारांच्या पक्षाने शरद पवारांच्या पक्षाला तगडी टक्कर देत अधिक जागा जिंकल्याचं निवडणुकीच्या आकडेवारीतून समोर आलं. स्वत: अजित पवारांनी बारामतीमध्ये आपलाच दरारा असल्याचं 1 लाखांहून अधिक मतांनी पुतण्या युगेंद्र पवार यांना पराभूत करुन दाखवून दिलं. शरद पवारांच्या पक्षाला केवळ 10 जागा विजय मिळाला तर 56 जागा लाढवून अजित पवारांच्या पक्षाने तब्बल 41 जागा जिंकल्या.

स्ट्राइक रेटच्या बाबतीत भाजपानंतर अजित पवारांच्या पक्षाचाच नंबर लागतो. त्यामुळेच आता अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. अजित पवारांनीही यापूर्वी अनेकदा मुख्यमंत्री होण्यीची इच्छा बोलून दाखवली होती.

इतर बातम्या
Join Whatsapp Group