दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने करवल नगरमध्ये बनावट मसाले बनवणाऱ्या दोन कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. या कंपनीमध्ये लाकडाचा भूसा, कुजलेला तांदूळ, रसायनांसह भेसळ केलेले मसाले तयार केले जात होते. या कारवाईमध्ये तब्बल १५ टन मसाले जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट मसाले बनवणाऱ्या कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारखान्यात कुजलेला तांदूळ, लाकूड भुसा आणि रसायनांसह भेसळ केलेले मसाले तयार केले जात होते. हे दोन्ही कारखाने दिल्लीतील करावल नगर येथे आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल १५ टन मसाले जप्त केले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
या भागातील काही उत्पादक आणि दुकानदार वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाने भेसळयुक्त मसाले तयार करून दिल्लीत विकत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेला या प्रकरणाचा तपास करण्यास सांगण्यात आले.
या गुप्त माहितीच्या आधारेगुन्हे शाखेच्या पथकाने १ मे रोजी करवल नगर भागातील दोन कारखान्यांवर छापा टाकला. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने दिलीप उर्फ बंटी आणि खुर्शीद मलिक याला घटनास्थळावरून पकडले.
यावेळी दिलीप हा भेसळयुक्त हळद बनवत होता, त्यासाठी तो ॲसिड व इतर प्रतिबंधित पदार्थ वापरत होता पोलिसांना पाहून दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांना पकडण्यात आले.
या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला अशाच एका कारखान्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्या कारखान्यावरही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी करवल नगर येथून 15 टन भेसळयुक्त मसाले आणि कच्चा माल जप्त केला आहे. तसेच दिलीप सिंग उर्फ बंटी (46, रा. करावल नगर), सरफराज (32, रा. मुस्तफाबाद) आणि खुर्शीद मलिक (42, रा. लोणी) या तिघांना अटक करण्यात आली आहे.