मोठी बातमी ! दिल्ली-मध्यप्रदेशसह ४ राज्यांमधून ५ संशयित दहशतवाद्यांना अटक
मोठी बातमी ! दिल्ली-मध्यप्रदेशसह ४ राज्यांमधून ५ संशयित दहशतवाद्यांना अटक
img
वैष्णवी सांगळे
मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि केंद्रीय एजन्सींनी अनेक राज्यांमध्ये छापे टाकून ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश करत ५ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. 

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, संशयित दहशतवादी भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होते. त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून भारतातील तरुणांना कट्टरतावादी बनवून त्यांच्या नेटवर्कमध्ये भरती केले. सांप्रदायिक द्वेष पसरवणे आणि धार्मिक सलोखा बिघडवणे या उद्देशाने हे दहशतवादी अनेक ऑनलाइन गट देखील चालवत होते. 

५ संशयितांपैकी दोन दिल्लीचे आणि प्रत्येकी एक मध्य प्रदेश, तेलंगणातील हैदराबाद आणि झारखंडमधील रांची येथील आहे. गट प्रमुख अशरफ दानिश रांची येथून आणि आफताब, सुफियान नावाच्या तरुणांना दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे.

अशरफ दानिश भारतातून दहशतवादी मॉड्यूल चालवत होता. रांची येथील त्याच्या लपण्याच्या ठिकाणावरून एक देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे, हायड्रोक्लोरिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड, सल्फर पावडर, तांब्याचे पत्रे, बॉल बेअरिंग्ज, स्ट्रिप वायर्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

आफताब आणि सुफियान हे मुंबईचे रहिवासी आहेत. स्पेशल सेलने मुंबईतील त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवरही छापे टाकले आहेत. तिथून शस्त्रे आणि आयईडी बनवण्याचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. सर्व संशयित दहशतवादी सोशल मीडिया अकाउंटद्वारे पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या संपर्कात होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group