कठुआमध्ये दहशतवाद्यांचा कहर!
कठुआमध्ये दहशतवाद्यांचा कहर!
img
Dipali Ghadwaje
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. या दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दल अनेक भागात शोधमोहीम राबवत आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी सामान्य लोकांना लक्ष्य केले आहे. 

हिरानगर सेक्टरमधील कुटा मोडजवळील सैदा सुखल गावात काल (मंगळवारी) संध्याकाळी दहशतवाद्यांनीअसाच हल्ला केला. येथे दोन सशस्त्र दहशतवादी सैदा सुखल गावात पोहोचले. येथे दहशतवाद्यांनी एका महिलेकडे पाणी मागितले, महिलेला दहशतवाद्यांचा संशय आला आणि तिने पाणी देण्यास नकार दिला. यानंतर दहशतवादी ओंकार नावाच्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्यांनी दारात येताच गोळीबार केला. या हल्ल्यात ओंकार जखमी झाला. 

यानंतर दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी गोळीबार केला. येथे बाईकवरून जात असलेल्या जोडप्यावरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला, मात्र ते थोडक्यात बचावले. यानंतर दहशतवादी अंधाराचा फायदा घेत तेथून निघून गेले. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम राबवली. 

यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबारही केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. अजूनही दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एके रायफल आणि एक बॅग जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मारला गेलेला दहशतवादी आणि त्याच्या गटाची ओळख पटवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

तिसरा हल्ला
दहशतवाद्यांनी बसवर केला गोळीबार जम्मू भागात अलीकडच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडेच रविवारी पोनी भागातील तेरायथ गावाजवळ शिव खोरी मंदिरापासून कटरा येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या ५३ आसनी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. हल्ल्यानंतर बस खड्ड्यात पडली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. 


डोडा येथेही चकमक सुरूच
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन यांनी सांगितले की, जिल्ह्यातील चतरगळा भागात दहशतवाद्यांनी ४ राष्ट्री य रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर गोळीबार केला. ते म्हणाले की, सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तर दिले, परिणामी चकमक झाली. आतापर्यंत ६ सुरक्षादल जखमी झाल्याची बातमी समोर आली
आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group