VIDEO : शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, चार जणांचा मृत्यू, दहा विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता!
VIDEO : शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, चार जणांचा मृत्यू, दहा विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता!
img
Dipali Ghadwaje
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये झेलम नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी (ता. १६) ही दुर्घटना घडली असून, श्रीनगरच्या बटवाराजवळ झेलम नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली. या घटनेत काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक विद्यार्थी बेपत्ता आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने बचावकार्य सुरू केलंय. आतापर्यंत १२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनेक विद्यार्थी आणि स्थानिकांना घेऊन गंडबाल ते बटवारा, श्रीनगरला जाणारी एक बोट आज पहाटे मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील बटवारा भागाजवळ झेलम नदीत उलटली या अपघातात काही लोक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, स्थानिक लोक SDRF आणि इतर अधिकाऱ्यांना त्वरीत बचावकार्य सुरू केले आहे.

या बोटीमध्ये 10 ते 12 शालेय विद्यार्थ्यांसह अनेक जण होते. अनेकजण बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव कार्य सुरू करण्यात आले असून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक देखील घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group