अलिबाग तालुक्यातील खांदेरी किल्ल्यावर गेलेल्या भाविकांची बोट समुद्रात कलंडली. सुदैवाने बोटीवरील 10 ते 12 जण सुखरूप बचावले. ही घटना 31 मार्च म्हणजे रविवारची आहे. बोट कलंडतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.
हे सर्वजण खांदेरी किल्ल्यावरील वेताळ देवाच्या दर्शनासाठी गेले होते. परतत असताना किल्ल्याजवळच बोट पाण्याच्या माऱ्याने कलंडली आणि बोटीवरील सर्वजण पाण्यात कोसळले. सुदैवाने हे सर्वजण पट्टीचे पोहणारे असल्याने सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आणि मोठा अनर्थ टळला.