मुंबईतील समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. निधेश राकेश अहिरे असं या मयत मुलाचं नाव आहे. त्याच्या आई-वडिलांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झालाय. राकेश नानाजी अहिरे व हर्षदा राकेश अहिरे अशी आई-वडिलांची नावं आहेत. ते नाशिक जिल्ह्यातील बसवंत, पिंपळगाव येथील रहिवासी होते.
अहिरे कुटुंबीय मुंबई येथे उपचारासाठी आले होते. दम्याच्या आजारावर उपचारासाठी पिंपळगावचे राकेश नाना अहिरे हे दोन दिवसापूर्वी पत्नी आणि मुलासह मुंबई येथे गेले होते. रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेऊन ते सायंकाळी मुबंईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले. पण बोट दुर्घेटनेत अहिरे कुटुंबियांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बोट दुर्घेटनेत अहिरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेने पिंपळगाव बसवंतच्या अहिरे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .