दुर्दैवी! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यू
दुर्दैवी! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा नदित बुडालेल्या २ तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल पथकाची बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल प्रवरा नदीत दोन तरुण बुडाल्याची घटना घडली होती. यांपैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. याच शोधकार्यासाठी आज एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. अकोले तालुक्यातील सुगाव गावजवळ ही शोधमोहिम सुरू होती. शोध घेण्यासाठी बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक तरुण बसला होता. 

याचदरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे पथकाची बोट उलटली. या दुर्घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इतर दोघांचा शोध सुरू आहे. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group