खासदार सुजय विखे पाटलांची नागरिकांसाठी अभिनव स्पर्धा!  थेट विमानाने घडवणार अयोध्येतील रामदर्शन
खासदार सुजय विखे पाटलांची नागरिकांसाठी अभिनव स्पर्धा! थेट विमानाने घडवणार अयोध्येतील रामदर्शन
img
Dipali Ghadwaje
२२ जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी नागरिकांना केले आहे. तसेच या राम मंदिर सोहळ्यानिमित्त सुजय विखे पाटील यांच्या वतीने 'मेरे घर आय श्रीराम' ही योजना देखील आखण्यात आली आहे.
 
भाजप खासदार सुजय विखे यांच्या कल्पनेतून अहमदनगर वासियांसाठी खास 'मेरे घर आये श्रीराम' हा खास उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील व्यक्ती 22 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या घराची सुंदर सजावट देखावा तयार करून त्यांना दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवतील.

व्हाट्सअपवर आलेल्या देखाव्यातून पहिल्या तीन कुटुंबाची निवड खासदार सुजय विखे पाटील हे करणार असून निवड निवडण्यात आलेल्या पहिल्या तीन कुटुंबातील प्रत्येकी दोन व्यक्तींना खासदार सुजय विखे पाटील हे विमानातून अयोध्यातील प्रभू श्रीरामांचे दर्शन घडवणार आहेत.

 
22 जानेवारी रोजी आयोध्येत श्री प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्याच पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांच्या वतीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात चार किलो साखर आणि एक किलो डाळ वाटप करण्यात आली.

त्यानंतर आता 'मेरे घर आये श्रीराम' या संकल्पनेतून निवडण्यात येणाऱ्या पहिल्या तीन कुटुंबातील व्यक्तींना सुजय विखे पाटील हे विमानाने रामाचे दर्शन घडवणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून विखेंकडून ही पेरणी करण्यात येत असल्याचे दिसत आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group