राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोठ्या संख्येने भाविक उत्तर प्रदेशातील अयोध्येला पोहोचत आहेत. भाविकांच्या आणि व्यावसायिकांच्या सेवेसाठी केंद्रीय नागरीक उड्डाण मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारीपासून आठ शहरांमधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उड्डाण सेवांचे उद्घाटन होणार आहे. स्पाइस जेट या कंपनीची विमाने नवीन मार्गावर उड्डाण करणार आहेत.
अयोध्येसाठी एक फेब्रुवारी 2024 पासून आठ नवीन उड्डाण मार्ग सुरू करण्याची तयारी आहे. दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा, मुंबई आणि बेंगळुरू या शहरांमधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. मुंबई ते अयोध्या या दरम्यान दररोज विमानसेवा असणार आहे.
मुंबईहून सकाळी 8.20 वाजता अयोध्येसाठी विमान उड्डाण करेल ते सकाळी 10.40 वाजता पोहचेल. तर, अयोध्येहून मुंबईसाठी सकाळी 11.15 वाजता विमान उड्डाण करेल ते दुपारी 1.20 वाजता मुंबईत दाखल होईल.
https://twitter.com/ANI/status/1752325884609229174?t=-qnDIIb2aYo8vqGFOYhw2g&s=19