अयोध्या येथील मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे, या सोहळ्यात सहभागी होऊन 121 वैदिक ब्राह्मणांचं नेतृत्व करणारे मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचं आज सकाळी निधन झालं.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 86 वर्षांचे होते. दरम्यान ही बातमी कळताच संपूर्ण देशात शोककळा पसरली.
जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पूजेत पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पूजा पूर्ण झाल्या. या पूजेत त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झाले होते. तसेच डिसेंबर 2021 मध्ये काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाच्या पूजेतही ते सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते अंथरुणाला खिळून होते. त्यांनी वाराणसीमध्ये शेवटचा श्वास घेतला. दीक्षित यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला.