प्रभू श्रीरामासाठी गुजरातच्या कुटुंबाकडून मोठी भेट, किंमत ऐकून व्हाल थक्क
प्रभू श्रीरामासाठी गुजरातच्या कुटुंबाकडून मोठी भेट, किंमत ऐकून व्हाल थक्क
img
Dipali Ghadwaje
अयोध्या या ठिकाणी प्रभू राम तब्बल 500 वर्षानंतर राम गर्भगृहात विराजमान झाले आहेत. 22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटात प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. एकेकडे अयोध्या याठिकाणी प्रभू राण यांची प्राणप्रतिष्ठा होत होती, तर दुसरीकडे संपूर्ण भारतात उत्साहाचं आणि राममय वातावण झालं. अयोध्येत राम मंदिराची स्थपना करण्यासाठी फक्त भारतातून नाही तर, जगभरातून दान आलं आहे. 

काही भाविकांना राम मंदिरासाठी वेगवेगळ्या वस्तू दान केल्या आहेत. दरम्यान सुरतमधील एका हिऱ्याच्या व्यापाऱ्याने अयोध्येतील रामल्लाच्या मूर्तीसाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा मुकुट दिला आहे. 

११ कोटींचा मुकूट प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसाठी तयार केला आहे. सुरतमधीस ग्रीन लॅब कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी हा मुकूट दिला आहे. हा मुकुट सोने, हिरे आणि मौल्यवान रत्नांनी बनवलेला आहे. हा मुकुट सहा किलोग्रॅम वजनाचा आहे. मुकेश पटेल यांनी त्यांच्या कुटुंबासह मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना हा मुकुट दिला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात त्यांनी हा मुकूट सूपूर्त केला आहे.

मुकेश पटेल यांनी मूर्तीसाठी काही दागिनेदेखील दिले आहेत. मुकेश यांनी त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांना रामाच्या मूर्तीचे मोजमाप करण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर या मापानुसार मुकुट तयार केला आहे. या मुकुटात ४ किलोग्रॅम सोने, हिरे, माणिक, मोती आणि विविध आकाराचे नीलम लावण्यात आले आहे.

२२ जानेवारीला अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या समारंभाला देशभरातील अनेक दिग्गज नेते, सेलिब्रिटी उपस्थित होते. देशभरात नागरिकांनी जल्लोष साजरा केला होता.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group