अयोध्येत UP ATSची मोठी कारवाई! तीन संशयितांना अटक
अयोध्येत UP ATSची मोठी कारवाई! तीन संशयितांना अटक
img
Dipali Ghadwaje
अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे.  या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशातच  उत्तर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश एटीएसने अयोध्येत अर्श डल्ला गँगशी संबंधित तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , तिन्ही संशयित सुखा डंके, अर्श डल्ला टोळीचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्श डल्लाच्या टोळीला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. सध्या एटीएसकडून संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.  ताब्यात घेतलेल्या तरुणांपैकी दोन तरुण राजस्थानमधील सीकर भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय एटीएसचे जवानही तैनात आहेत. सर्व सैनिकांकडे आधुनिक शस्त्रेही आहेत. यासोबतच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या नजरेतून कोणीही सुटू नये यासाठी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

सरयू नदी आणि घाटांवर एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. अयोध्येत दाखल होणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेसाठी बार कोडिंगचा वापर केला जात आहे. कडेकोट रेल्वे सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी २५० पोलीस मार्गदर्शक तैनात करण्यात आले आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group