दुबई, सिंगापूरपेक्षा महाग आहे विमान प्रवास, एका तिकिटासाठी मोजावे लागणार
दुबई, सिंगापूरपेक्षा महाग आहे विमान प्रवास, एका तिकिटासाठी मोजावे लागणार "इतके" पैसे
img
Dipali Ghadwaje
अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, अयोध्येतील या उद्घाटन सोहळ्यासाठी राम भक्त उत्सुक आहेत. दरम्यान, अयोध्येला जाण्यासाठी विमानप्रवास महागला आहे. दुबई, सिंगापूरपेक्षाही अयोध्येला जाण्यासाठी विमानाचे तिकीट जास्त आहे. अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरु झाल्याने हवाई वाहतूक कंपन्यांनी प्रवासाचे दर वाढवले आहेत. 

येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये राममंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि थेट अयोध्येकरिता विमान सेवा सुरू झाल्यामुळे भाविकांचा, तसेच पर्यटकांचा अयोध्येकडील ओढा वाढला असून, यामुळे तेथील विमान तिकिटांनी एकेरी मार्गासाठी २० हजारांचा दर गाठला आहे. मुंबई ते अयोध्या या एकेरी मार्गावरील दर हे अनेक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांच्या पुढे गेले आहेत.

दुबई, सिंगापूरपेक्षा अयोध्येला जाण्यासाठी विमानाचे तिकीट महाग
सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यसाठी हजर राहण्यासाठी राम भक्त प्रयत्न करत आहेत. 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी भक्तांचा ओढा वाढताना दिसत आहे. त्यातच अयोध्येला थेट विमानसेवा सुरु झाल्याने हवाई वाहतुकीचे दर वाढवण्यात आले आहेत. दुबई आणि बँकॉकपेक्षा अयोध्येला जाण्यासाठी तिकीट जास्त आहे. 

कसे आहेत विमान प्रवासाचे दर?
 
मुंबई ते दुबई - 16,937

मुंबई ते सिंगापूर -13,800 


मुंबई ते बँकॉक - 16,937 

मुंबई ते अयोध्या - 20,700  
 
अयोध्येत विमानसेवा सेवेला सुरुवात 
'अयोध्येत मर्यादा पुरोषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळा'ची निर्मिती करण्यात आली आहे. 'इंडिगो'ने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये अयोध्येतून दिल्ली आणि अहमदाबादसाठी फ्लाईट सुरु होणार आहेत. इंडिगो ही कंपनी अयोध्येतून व्यावसायिक दृष्ट्या 6 जानेवारीपासून मुंबईसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली. राममंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.  22 जानेवारीला रामजन्मभूमीत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी राममंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आहे. देशभरातून रामभक्त अयोध्यानगरीत दाखल होतील. त्यामुळे इंडिगोने मुंबईतून फ्लाईट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group